Description

स्थळाचे नाव: रामेश्वर धबधबा, सौताडा

स्थ महात्म्य: निसर्गरम्य धबधब्याचे ठिकाण व मंदिरे

ठिकाणाचा प्रकार: धबधबा व मंदिरे

माहिती: जामखेड पासून काही अंतरावर हे ठिकाण आहे. या ठिकाणी निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहण्यासाठी पर्यटकांची व भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. दंडकारण्यात प्रभु श्रीराम वास्तव्यास असताना या ठिकाणी त्यांनी सीता मातेसाठी आपल्या बाणाद्वारे येथील धबधब्याची निर्मिती केली अशी आख्यायिका सांगण्यात येते. जामखेड मार्गे सौताडा येथून २ किमी अंतर पुढे जाऊन दरीतून जवळपास ४०० पायऱ्या उतरल्यानंतर आपण थेट येथील महादेवाच्या मंदिराजवळ पोहचतो. येथील मंदिरातील स्वयंभू लिंगाची स्थापना प्रभु श्रीरामांनी केली अशी आख्यायिका सांगण्यात येते. बाजूला याच ठिकाणी कृष्ण मंदीर, कपिलेश्वराचे मंदीर आहे व बोंबल्या मारुती मंदिर आहे. या संपूर्ण मंदिर परिसराला लगत रामेश्वर धबधबा आहे. हे पाणी ज्या कुंडात पडते त्याला रामकुंड असेही म्हणतात.

सण/उत्सव:

  • महाशिवरात्र महोत्सव.
  • श्रावण महिन्यात दर सोमवारी येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते व तिसऱ्या सोमवारी सप्ताह केला जातो.
  • रामजन्म सोहळ्याचाही मोठा उत्सव येथे साजरा होतो.

Photos